Thursday, May 31, 2007

निबंध..

गाढव हा माझा आवडता प्राणी आहे .
माझे पप्पा मला बरेचदा "गाढव आहेस" असे म्हणतात. त्यांच्यापेक्षा मला माझी आईच खूप आवडते. ती माझे खूप लाड करायची.
गाढवाला दोन डोळे , दोन कान चार पाय आणि एक शेपूट असते. त्याच्या अंगावरती पट्टे मारले तर ते झेबर्यासारखेच दिसते. आपण रस्ता नेहेमी झेबरा क्रॉसींग वरूनच क्रॉस करावा.
गाढव ओझे वाहायला ऊपयोगी पडते.

ईसाप नीती मध्ये गाढवाची गोष्ट पण आहे. माझी आजी छान छान गोष्टी सांगते गाढव लाथा मारते. लाथा तर बटीस्टा पण मारतो. पण तो रेडा आहे. गाढवाच्या मागे आणी साहेबाच्या पुढे ऊभे राहू नये असे माझे बाबा म्हणतात.

पण माझा साहेब पण गाढवच आहे. त्यामुळे मी नेहेमी त्याच्या बाजूलाच ऊभा रहातो. गाढव रस्त्यावरच रहाते. भारतात रस्त्यावर भिकारी पण रहातात. नारायण अडला की गाढवाचे पाय धरतो. पण पुढचे धरतो की मागचे ते ठाऊक नाही. 'गाढवीच्या' अशी एक शिवी पण आहे. मला अजून भरपूर शिव्या येतात. पण शिवीगाळ चांगली नव्हे. काल मुठा नदीतून खूप गाळ काढला.

Monday, May 14, 2007

माझ्या काही (च्या काही) कविता

होकारापूर्वी..

क्षण वाटे मज हवा हवा
क्षण वाटे मज नवा नवा

क्षण न कळे मजला येतो कसा कुठून
क्षण न कळे मजला जातो कसा निघून

कळी वाटे मज थांबली तिच्या स्पर्शासाठी
कळी वाटे मज फुलते तिच्या ओठांकाठी

फ़ुल वाटे मज तिने कुरवाळीले प्रेमाने
फ़ुल वाटे मज झुरते तिच्या बटांसाठी

व्रुक्ष उभा आतपी किती वाट त्या पाहिली
व्रुक्ष म्हणे देउ तिजला शीतल सायली


नकारानंतर....

क्षण वाटे मज जुना जुना
क्षण वाटे मज सुना सुना

क्षण कळतो मजला येतो कसा कुठुन
क्षण उमजे मजला जातो कसा छळून

कळी वाटे मज कोमेजली तिच्या विरहाने
कुणी न पाहिले तिच्याकडे पुन्हा वळूनी

फुल वाटे मज चुरगाळिले तिने गर्वाने
दळभार त्यास आता येणार कसा फिरुनी?

व्रुक्ष मी उभा शिशिरी, पुन्हा पर्णहीन,
व्रुक्ष भासे मजला म्हणे - इयें जगणे कठीण ..


न(व)कवी

**********************************************************************************

प्रेमपत्र

हे माझे प्रियकरणी
करतो तुझी मनधरणी
सावर मजला समररणी
होउनी चप्पल माझे चरणी ॥ ध्रु ॥

तू रिन ची धुलाई
तू विम ची सफ़ाई
तू दुधावरची मलई

मी जाई तू जुई
मी दोरा तू सुई
मी कागद तू शाई
मी पुस्तक तू छपाई

मी बाळ अवखळ, तू अंगाई
मी पथिक जलेच्छु, तू पाणपोई
तू वस्त्र भरजरी मी सूतकताई,
मी भाकर कोरडी तू रसमलाई,

मी भांडे कळकटलेले, तू कल्हई
आणि तूच 'दी ऑईल ईन माय जीवनसमई'