Monday, May 14, 2007

माझ्या काही (च्या काही) कविता

होकारापूर्वी..

क्षण वाटे मज हवा हवा
क्षण वाटे मज नवा नवा

क्षण न कळे मजला येतो कसा कुठून
क्षण न कळे मजला जातो कसा निघून

कळी वाटे मज थांबली तिच्या स्पर्शासाठी
कळी वाटे मज फुलते तिच्या ओठांकाठी

फ़ुल वाटे मज तिने कुरवाळीले प्रेमाने
फ़ुल वाटे मज झुरते तिच्या बटांसाठी

व्रुक्ष उभा आतपी किती वाट त्या पाहिली
व्रुक्ष म्हणे देउ तिजला शीतल सायली


नकारानंतर....

क्षण वाटे मज जुना जुना
क्षण वाटे मज सुना सुना

क्षण कळतो मजला येतो कसा कुठुन
क्षण उमजे मजला जातो कसा छळून

कळी वाटे मज कोमेजली तिच्या विरहाने
कुणी न पाहिले तिच्याकडे पुन्हा वळूनी

फुल वाटे मज चुरगाळिले तिने गर्वाने
दळभार त्यास आता येणार कसा फिरुनी?

व्रुक्ष मी उभा शिशिरी, पुन्हा पर्णहीन,
व्रुक्ष भासे मजला म्हणे - इयें जगणे कठीण ..


न(व)कवी

**********************************************************************************

प्रेमपत्र

हे माझे प्रियकरणी
करतो तुझी मनधरणी
सावर मजला समररणी
होउनी चप्पल माझे चरणी ॥ ध्रु ॥

तू रिन ची धुलाई
तू विम ची सफ़ाई
तू दुधावरची मलई

मी जाई तू जुई
मी दोरा तू सुई
मी कागद तू शाई
मी पुस्तक तू छपाई

मी बाळ अवखळ, तू अंगाई
मी पथिक जलेच्छु, तू पाणपोई
तू वस्त्र भरजरी मी सूतकताई,
मी भाकर कोरडी तू रसमलाई,

मी भांडे कळकटलेले, तू कल्हई
आणि तूच 'दी ऑईल ईन माय जीवनसमई'

1 comment:

Mukta A said...

Hahahaha... donhi poems ekdum masta ahet!! :)